मोदींची विकेट जाणार

April 19, 2010 11:09 AM0 commentsViews: 1

19 एप्रिलबीसीसीआय आता आयपीएलचे कमिशनर ललित मोदी यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे. 2 मे रोजी बीसीसीआयची बैठक होत आहे. मोदी यांच्या विरोधात ठराव आणण्याची योजना शशांक मनोहर आणि एन. श्रीनिवासन आखत आहेत. यामुळे मोदी यांच्या अधिकारांना कात्री लागू शकते. किंवा त्यांची उचलबांगडी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. शरद पवारांचा मोदींना पाठिंबा आहे. पण बीसीसीआय मात्र मोदींवर नाराज आहे. आयपीएलमध्ये मोदी यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आयटीच्या रिपोर्टमुळे धक्का बसला आहे. या गैरव्यवहारांची बीसीसीआय अंतरिम चौकशी करणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने तीन जणांची समिती नेमली आहे.

close