शेअर मार्केट डाऊन पण महागाई खाली

October 16, 2008 3:22 PM0 commentsViews: 49

16 ऑक्टोंबर, मुंबईजगभरातील शेअर बाजाराच्या मंदीचं सावट आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आलं. दिवसअखेर सेन्सेक्स 10 हजार 538 वर बंद झाला. 227 पॉइंट सेन्सेक्स खाली होता तर निफ्टी 3269 अंशावर बंद झाला. शेअर बाजार मंदीतून जात असताना महागाईच्या दराची आकडेवारी खाली आली आहे. क्रूड तेलाच्या किंमतीही खाली उतरल्या आहेत. अमेरिकेसह आशिया मार्केटचे शेअर बाजार आज घसरणीला लागले.मुंबई शेअर बाजारातही त्याचा परिणाम दिसला. सेन्सेक्स 10 हजार 200 च्या खाली गेला. सकाळच्या सत्रात तब्बल 600 अंशांची घसरण झाली. निफ्टीमध्येही काही वेगळी स्थिती नव्हती. 180 अंशांची घसरण होऊन निफ्टी 3 हजार 200 च्या खाली आला. मार्केट तज्ज्ञ एस पी तुलसियान यांनी गुंतवणुकदारांना या अस्थिर परिस्थितीत एक निश्चित लक्ष्य ठेवण्याचा आणि कमीत कमी एक वर्षापर्यंत म्हणजे लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर बाजार मंदीतून जात असताना महागाईच्या दराची आकडेवारी खाली आली आहे. महागाईचा दर 11.44 टक्के झालाय. हा दर आधी 11.80 टक्के होता तर दुसरीकडे क्रूड तेलाच्या किंमतीही खाली उतरल्या आहेत. क्रूड तेलाची किंमतही 72.72 डॉलर प्रति बॅरलपर्यंत आली आहे. 14 महिन्यांतला हा सगळ्यात कमी दर आहे. दिवसभराच्या चढउतारांनंतर सेन्सेक्स जवळपास अडीच टक्क्यांवर बंद झाला.

close