मनू शर्माची जन्मठेप कायम

April 19, 2010 11:37 AM0 commentsViews: 6

19 एप्रिलमॉडेल जेसिका लाल हत्याकांडप्रकरणातील आरोपी मनू शर्मा याची जन्मठेपेची शिक्षा सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली आहे. दिल्ली हायकोर्टाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सुप्रीम कोर्टात तब्बल 11 वर्षांनंतर या प्रकरणी अंतिम निकाल दिला गेला. हायकोर्टाने या खटल्यातील सहआरोपी विकास यादव आणि अमरजीत सिंह गिल यांना पुरावे नष्ट करण्याच्या आरोपात दोषी ठरवले होते. त्यांना सुप्रीम कोर्टाने चार वर्षांची शिक्षा दिली आहे एक नजर टाकूया या हत्या प्रकरणावर…29 एप्रिल 1999 – दिल्लीत जेसिका लालची गोळ्या घालून हत्या 6 मे 1999 – मुख्य आरोपी मनू शर्मा शरण आला18 डिसेंबर 2006 – दिल्ली हायकोर्टानं मनू शर्माला हत्या आणि पुरावे नष्ट करण्याप्रकणी दोषी ठरवले. आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

close