मराठा आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

September 19, 2016 10:39 AM0 commentsViews:

3

19 सप्टेंबर :  मुंबई हायकोर्टात 15 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणावर आज (सोमवारी) सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. औरंगाबादच्या विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी होणार आहे.

राज्यातील मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 16 टक्के आरक्षण देण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला आव्हान देणार्‍या याचिका मुंबई हायकोर्टात अद्यापही प्रलंबित आहेत. राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणावरून सध्या आपत्स्थिती असल्याने हे प्रकरण तातडीने निकाली काढण्यासाठी याचिकाकर्त्याच्या भूमिकेला महाराष्ट्र सरकारनेही पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मुंबई हायकोर्टात मराठा समाजाच्या आरक्षणावरून प्रलंबित असलेल्या याचिका तातडीने निकाली काढण्याबाबत विनोद पाटील यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली. पण ती याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर विनोद पाटील यांनीही सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यावर आज सुनावणी होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा