बीसीसीआयची चौकशी सुरू

April 19, 2010 12:03 PM0 commentsViews: 1

19 एप्रिलबीसीसीआयच्या टॅक्स रेकॉर्डस्‌ची सध्या चौकशी सुरू आहे. येत्या तीन ते सहा महिन्यात या चौकशीचा अहवाल येण्याची शक्यता आहे. मुंबईच्या आयकर विभागाने आता बीसीसीआयलाही नोटीस पाठवली आहे. या नोटीशीला येत्या 20 एप्रिलपर्यंत बीसीसीआयला उत्तर देण्याचे आदेशही देण्यात आलेत.गेल्या नोव्हेंबरमध्येच बीसीसीआयला सर्व प्रकारच्या कर सवलती बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे बीसीसीआयला हे सर्व कर भरावे लागणार आहेत. आयपीएल ही कुठलीही स्वतंत्र रजिस्टर्ड संस्था नाही, असेही या नोटीशीत नमूद करण्यात आले आहे.

close