‘चाय पे वायफाय’,बुलडाण्यात चहा विक्रेत्याची नामी शक्कल

September 19, 2016 5:15 PM0 commentsViews:

बुलडाणा, 19 सप्टेंबर : आपण आजवर रेल्वे स्टेशन, बस स्टेशन इत्यादी ठिकाणी वायफाय सुविधा असलेल ऐकलं असेल पण बुलडाण्यात चक्क एक चहा विक्रेत्याने आपल्या ग्राहकांसाठी मोफत वायफायची सुविधा सुरू केली आहे.

पंजाबराव देशमुख यांचा हा चहाविक्रेतेचा व्यवसाय आहे. ते गेल्या 25 वर्षांपासून शेगावच्या रेल्वे स्थानकावर चहा विक्रीचा व्यवसाय करत आहेत. फ्री वायफायच्या या सुविधेमुळे पंजाबरावांच्या चहा विक्रीला जरा वेगळाच जोर चढलाय, कॉलेज चे विद्यार्थी, युवक, तसंच येणारे जाणारे मोठ्या प्रमाणात याठिकाणी चहाच्या आस्वादासोबत वायफायची सेवा वापरण्याकरिता गर्दी करत आहेत.buldhana_tea_wifi

याच चहाच्या व्यवसायावर पंजाबराव देशमुख यांनी आपल्या मुलीला इंजिनिअर केलं आहे. मुलीच्या संकल्पनेतून पंजाबराव देशमुख यांनी आपल्या ग्राहकांसाठी ” फ्री वायफाय” सेवा सुरू केली आहे. साहजिकच टी स्लवर तरुणांची गर्दी होतेय. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या डिजिटल इंडिया ची आठवण देखील करून दिली आहे. त्यामुळे इंटरनेटने जगाशी जुळण्याची एक संधीच या चहा विक्रेत्याने आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा