खासगी महाविद्यालयात वैद्यकीय प्रवेशासाठी डोमेसाईल बंधनकारकच : हायकोर्ट

September 19, 2016 5:42 PM0 commentsViews:

19 सप्टेंबर : खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिलाय. खासगी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये 85 टक्के प्रवेश महाराष्ट्राचा रहिवास दाखला असणार्‍यांनाचं आता प्रवेश दिला जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं तसा अंतरीम आदेशही दिला आहे. रहिवासी दाखल्याचा मुद्दा बाजुला ठेवण्याची मागणी खासगी महाविद्यालयाची मागणी कोर्टाने फेटाळून लावली आहे.

mumbai high court434खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील 85 टक्के प्रवेशांकरता डोमेसाईल म्हणजे रहिवाशी दाखला बंधनकारक करण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवलाय. या निर्णयात स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका खाजगी महाविद्यालयाने केली होती. पण ही मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे यंदाचे वैद्यकीय महाविद्यालयातील 85 टक्के जागा या ज्यांच्याकडे डोमेसाईल म्हणजेच रहिवाशी दाखला आहे त्यांनाच मिळणार आहे. यामुळे राज्यतील विद्यार्थ्यांना खूप मोठा दिलासा असून, खाजगी महाविद्यालयांना मोठा दणका बसल्याचे बोललं जातंय.

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला हा आदेश अंतरीम असून पुढील सुनावणी 3 आठवड्यात नंतर ठेवण्यात आलीये. नीट परीक्षेद्वारे खाजगी महाविद्यालयांचे प्रवेश होत आहेत. त्यामुळे राज्य सरकारचे नियम आम्हाला लागू होवू नयेत अशी खाजगी महाविद्यालयांची मागणी होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला नाहीये. येत्या 30 सप्टेंबर पासून वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा