मंत्रिपदी असा व्यवहार अपेक्षित नव्हता, कोर्टाचे खडसेंवर ताशेरे

September 19, 2016 7:34 PM0 commentsViews:

19 सप्टेंबर : मंत्रिपदी असताना कोणत्याही व्यक्तीनं किंवा त्यांच्या संबंधितानं असा व्यवहार करणं अपेक्षित नाही असे ताशेरे हायकोर्टाचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंवर ओढले. तसंच हायकोर्टाने भोसरी भूखंडाचा अहवाल मागितला असून दोन आठवड्यात चौकशी अहवाल सादर करा असं आदेश पोलीस आणि महसूल खात्याला दिले आहे.

court_khadseभोसरी भूखंड प्रकरण, दाऊद कॉल प्रकरणामुळे एकनाथ खडसेंना मंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. चौकशीअंती एकनाथ खडसे यांना दाऊद कॉल प्रकरण, जावायाची लिमोझिन कार आणि गजानन पाटील लाच प्रकरणात क्लिन चिट मिळाली आहे. भोसरी प्रकरणाचा निकाल बाकी असल्यामुळे खडसेंचा परती मार्गावर सस्पेन्स कायम आहे. पण, आज हायकोर्टाने खडसेंना धक्का दिलाय. हेमंत गवंडे यांनी मुंबई हायकोर्टात या प्रकरणी रिट क्रिमिनल याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर सुनावणी दरम्यान, भोसरी एमआयडीसीच्या जागेच्या एमआयडीसी, महसूल विभाग आणि पोलीस खात्याने दोन आठवड्यात आपला अहवाल कोर्टाला सादर करावा. मंत्रिपदी असताना कोणत्याही व्यक्तीनं किंवा त्यांच्या संबंधितानं असा व्यवहार करणं अपेक्षित नाही असे ताशेरे हायकोर्टाचे खडसेंवर ओढले. या प्रकरणी काय चौकशी केली अशी विचारणा कोर्टाने पोलिसांना केलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा