महाराष्ट्राच्या वीरपुत्रांचे पार्थिव मातृभूमीत

September 19, 2016 7:51 PM0 commentsViews:

parthiv34नाशिक, 19 सप्टेंबर : उरी इथं दहशतवादी हल्यातील शहिद झालेल्या राज्यातल्या तीन जवानांचं पार्थिव घेवून वायू दलाचं विशेष विमान ओझर विमानतळावर उतरल होतं. विमानतळावर सिन्नरचे शहीद जवान संदीप ठोक यांना लष्करी मानवंदना दिल्यानंतर त्यांचं पार्थिव सिन्नरकडे रवाना झालंय.

शहीद संदीप ठोके यांना मानवंदना देऊन वायूदलाचं विमान नागपूरकडे रवाना होईल, नागपूर विमानतळावर शहिद जवान पंजाब उईके यांच्या पार्थिवाला लष्करी मानवंदना दिल्यानंतर पार्थिव अमरावती जिल्ह्यात त्यांच्या नांदगाव खंडेश्वर इथं पाठवलं जाणार आहे. नागपूरनंतर विमान पुण्याकडे रवाना होईल. शहीद लान्सनायक चंद्रकांत गलांडे यांचं पार्थिव पुण्याला उतरवण्यात येईल. लष्करी मानवंदनेनंतर त्यांचं पार्थिव सातार्‍याकडे त्यांच्या मुळगावी रवाना होईल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा