सामूहिक बलात्कार प्रकरणी मोक्का लावणार

April 19, 2010 1:15 PM0 commentsViews:

19 एप्रिलपुण्यात गेल्या काही दिवसात महिलांवर सामूहिक बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. गेल्या आठवड्यातही पुण्यातील एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली. यातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. राज्यात महिलांवर होणार्‍या अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या मुद्दयावर विरोधक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आक्रमक झाले. स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चेची मागणी विरोधकांनी केली होती. पण ती मान्य न करता सरकारने यावर उद्या चर्चेची तयारी दाखवली आहे.

close