गुणकारी हळदीचे फायदे

September 19, 2016 9:06 PM0 commentsViews:

स्वयंपाकघरात बनणार्‍या जवळपास प्रत्येक पदार्थात आपण हळदीचा वापर करतो. मात्र त्याहुन अनेक अशा गोष्टी आहे ज्यासाठी हळदीचा उपयोगी होतो. पदार्थांमध्ये चव आणि रंगत वाढवणारी ही हळद आरोग्यासाठी खूप गुणकारी असते.

- तोंड आल्यावर पाण्यात चिमुटभर हळद मिसळुन त्या पाण्याने गुळण्या कराव्या,त्याने आराम मिळतो.

- सर्दी-खोकल्यामुळे जेव्हा नाक बंद होते आणि श्‍वसनाला त्रास होतो तेव्हा मधात हळद आणि मिरपुड मिसळुन ते खावे.

- साईनस,दमा आणि कफपासून सुटकारा मिळवण्यासाठी गरम दुधात चिमुटभर हळद मिसळुन ते दूध प्यावे.

- “लग्नही अशी एकमेव जखम आहे जी होण्याआधी ‘हळद’ लावतात”, असं गमंतीने म्हटलं जातं. पण,
जर तुम्हाला मुक्का मारला लागला असेल, किंवा हात-पाय मुरगळला असेल तर त्यावर गरम पाण्यात हळद उकळवून कोमट झाल्यावर लावावी. त्यामुळे सुज कमी होण्यास मदत होते.

- जखम, फोड आणि बारीक पुळ्या येणे, विषारी कीटक दंश इत्यादी वर हळदीचा लेप लावला जातो. वेदना कमी होऊन जमलेले रक्त पसरले जाते.

हळदीतील अनेक औषधी गूण अनेक वेदनांना आपल्यापासून दूर पळवून लावतात. शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करणे आणि वेदना कमी करणे ही हळदीची गुणवैशिष्ट्य आहेत. त्यामुळेच स्वयंपाकघरात हळदीचं मानाचं स्थान आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा