‘पाकला योग्य वेळी, योग्य ठिकाणी उत्तर देऊ’

September 19, 2016 9:49 PM0 commentsViews:

19 सप्टेंबर : जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये लष्कराच्या कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्या उत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत पण योग्य वेळी, योग्य ठिकाणी उत्तर देऊ असा इशारा डीजीएमओचे लेफ्टनेंट जनरल रणवीर सिंह यांनी दिलाय. तसंच याचं उत्तर देण्यासाठी ठिकाणी वेळ आम्ही निवडू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.ranvir_singh33

उरी सेक्टरमध्ये रविवारपासून सुरू असलेले ऑपेरशन आज संध्याकाळी संपलं. सर्च ऑपरेशनमध्ये मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थाचं साहित्य मिळालं. हे पदार्थ पाकमध्ये तयार करण्यात आले होते. सोबतच 4 रायफल, 39 ग्रेनेड, 2 रेडिओ सेट जप्त करण्यात आले आहे अशी माहिती रणवीर सिंह यांनी दिली. तसंच 17 अतिरेक्यांचा प्रयत्न हाणून पाडला असून 31 अतिरेक्यांचा बार्डर पार करताना खात्मा करण्यात यश आलंय. मागील दोन्ही हल्ल्यात 4-4 अतिरेक्यांना कंठस्नान घातलं असं सिंह यांनी सांगितलं.

उरीमध्ये रविवारी लष्कराच्या कॅम्पवर झालेल्या हल्ल्यात 18 जवान शहिद झाले आहे. उरीमध्ये हल्ल्यामागे पाकचा हात असल्याचंसमोर येत आहे. अतिरेक्यांकडे जीपीएस ट्रॅकर मिळाले असून त्याचा स्ट्राटिंग हा पाईंट हा पाकिस्तान आहे. त्यासोबतच पाकिस्तानी चिन्ह असलेले हत्यार सुद्धा मिळाले आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेतील आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासोबतही चर्चा केलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा