शोएबचा परतीचा मार्ग खुला

April 19, 2010 1:27 PM0 commentsViews: 6

19 एप्रिलपाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकचा पाकिस्तानला परतण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आंध्रप्रदेश हायकोर्टाने त्याचा पासपोर्ट परत करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. शोएबची अगोदरची पत्नी आयेशा सिद्दिकी हिने तक्रार दाखल केल्यानंतर त्याचा पासपोर्ट पोलिसांनी जप्त केला होता.पण आयेशा आणि शोएबमध्ये नंतर तडजोड झाली. आणि शोएबने आयेशाला तलाक देऊन सानिया मिर्झाशी लग्न केले. आता सानिया आणि शोएब ही नवविवाहीत जोडी शोएबच्या घरी म्हणजे सियालकोटला जाणार आहे.

close