गृहमंत्री राजनाथ सिंहांची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठक

September 20, 2016 1:14 PM0 commentsViews:

rajnath_3_1_0_020 सप्टेंबर : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज 3 दिवसांतली तिसरी बैठक बोलावली होती. साडे अकराच्या सुमाराला ही बैठक संपली. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजितकुमार डोवाल, गुप्तचर विभाग आणि रॉचे प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसंच परराष्ट्र सचिव एस. जयशंकरही बैठकीत सहभागी झाले.

गृह मंत्रालयाच्या नॉर्थ ब्लॉकमधल्या कार्यालयात ही बैठक 11च्या सुमाराला सुरू झाली. पाकिस्तानवर गुरिला पद्धतीनं हल्ले करायचे असतील, तर त्यात रॉ आणि आयबीचा वाटा मोठा असेल. त्या अनुषंघानं गृह मंत्रालयाच्या या बैठका महत्त्वाच्या ठरू शकतात. संरक्षण मंत्रालयही कोणत्या प्रकारची कारवाई करता येईल, याचा विचार करतं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा