सचिन-सौरव आमने-सामने

April 19, 2010 1:33 PM0 commentsViews: 2

19 एप्रिलआयपीएल लीगमधील सेमीफायनलपूर्वीची शेवटची मॅच आज रंगेल. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सदरम्यान ही मॅच खेळवली जाईल. आयपीएलमध्ये सर्वाधिक मॅच जिंकत मुंबईने याआधीच सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. 13 मॅचपैकी तब्बल 10 मॅचमध्ये मुंबईने विजय मिळवला आहे. त्यामुळे विजयाची ही मालिका कायम ठेवत सेमीफायनलमध्ये खेळण्याचा निर्धार मुंबई टीमचा असेल.कोलकाता नाईट रायडर्ससाठीही मात्र ही मॅच अतिशय महत्वाची असणार आहे. सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी नाईट रायडर्सला ही मॅच केवळ जिंकून चालणार नाही तर मोठ्या फरकाने मुंबईचा पराभव करावा लागणार आहे. गेल्या मॅचमध्ये कोलकाताने राजस्थानचा दणदणीत पराभव करत सेमीफायनलचे आव्हान जिंवत ठेवले आहे. कॅप्टन सौरव गांगुली जबरदस्त फॉर्मात असल्याने ही मॅच सचिन तेंडुलकर विरुध्द सौरव गांगुली अशीच रंगणार आहे.

close