पंकजा मुंडेंचा पालघर दौरा वादात, जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले जमावबंदीचे आदेश

September 20, 2016 4:35 PM0 commentsViews:

pankaja_munde4420 सप्टेंबर :  महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा पालघर दौरा वादात सापडला आहे. मोखाडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहे. त्यामुळे जमावबंदी असताना पंकजा मुंडेंनी दौऱ्यावर जाणार की नाही असा प्रश्न उपस्थिती झालाय.

आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या वादग्रस्त विधानामुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली. मोखाडमध्ये कुपोषणामुळे सागर वाघ या मुलांचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबियाची भेट घेण्यासाठी सावरा गेले असता 600 मुलं मेली तर  असू द्या की असं वक्तव्य सावरा यांनी केलं. त्यानंतर विरोधकांनी सावरांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. कुपोषणाच्या प्रश्नी काँग्रेसचे नेते राधकृष्ण विखे पाटील, धनंजय मुंडे यांनी मोखाडमध्ये जाऊन वाघ कुटुंबियांची सांत्वन भेट घेतली.

महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचाही मोखाड दौरा नियोजित होता. मात्र, सावरा यांच्या दौऱ्याच्या वेळी झालेल्या गोंधळामुळे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी जमावबंदीचे आदेश दिले आहे. उद्या सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मोखाड तालुक्‌यात जमावबंदी असणार आहे. खोच आणि कळंबवाडी गावातही जमावबंदी  असणार आहे. त्यामुळे ऎन दौऱ्याच्या आदल्या दिवशी जमाबंदी लागू झाल्यामुळे पंकजा मुंडे दौरा वादात सापडला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा