राजकारण्यांनी खेळापासून दूर जाऊ नये

April 19, 2010 1:40 PM0 commentsViews: 2

19 एप्रिलएका नेत्यामुळे सगळ्या राजकारण्यांनी खेळापासून दूर जाण्याची गरज नाही, असे मत सिव्हिल एव्हीएशन मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले आहे. अभिजित कदम फुटबॉल डेव्हलमेंट केंद्राचे उद्घाटन आज पुण्यात प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते झाले. यावेळी विश्वजीत कदम, पतंगराव कदम, रितेश देशमुख, प्रिया दत्त असे अनेक मान्यवर उपस्थित होते. सगळे राजकारणी एक सारखे नसतात. जे खेळासाठी चांगले काम करत आहेत, त्यांनी ते काम सुरूच ठेवले पाहिजे असे पटेल यावेळी म्हणाले. फुटबॉलशी निगडीत वेगवेगळ्या गोष्टींचे ट्रेनिंग या सेंटरच्या माध्यमातून दिले जाणार आहे. देशातील फुटबॉलच्या प्रगतीसाठी हे महत्वाचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

close