स्मार्टसिटीची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील 5 शहरांचा समावेश

September 20, 2016 8:13 PM0 commentsViews:

M. Venkaiah Naidu

20 सप्टेंबर : केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी आज (मंगळवा) देशभरात विकसित करण्यात येणार्‍या ‘स्मार्ट सिटी’च्या तिसर्‍या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या शहरांची नावं घोषित केली. या यादीमध्ये महाराष्ट्र राज्यामधील पाच शहरांचा समावेश आहे.

स्मार्ट सिटीसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये एकूण 63 शहरांनी सहभाग घेतला होता; त्यामधल्या 27 शहरांची निवड करण्यात आली असल्याची माहिती नायडू यांनी यावेळी दिली. या यादीमध्ये राज्यातील कल्याण डोंबिवली, नागपूर, ठाणे, औरंगाबाद आणि नाशिक या शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

मोदी सरकारने 2019-2020 पर्यंत जवळपास 100 शहरांचा कायापालट करण्याचं निश्चित केलं आहे. त्यादृष्टीने स्मार्ट सिटीची संकल्पना पुढे आली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा