ब्रँजेलिना होणार विभक्त, अँजेलिना जोलीनं ब्रॅड पीटकडे केली घटस्फोटाची मागणी

September 20, 2016 11:18 PM0 commentsViews:

dc-Cover-4oqq7ejrc8h34jhsnhu60eg937-20160531092112.Medi

20 सप्टेंबर : हॉलिवूडमधली सर्वात हॉट जोडी म्हणजे ब्रँजेलिना, अर्थात अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट. आता मात्र ही जोडी विभक्त होणार आहे. अँजेलिना जोलीनं ब्रॅड पिटकडून घटस्फोट मिळावा यासाठी अर्ज दाखल केला आहे. अँजेलिनाच्या वकिलानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

अँजेलिना आणि ब्रॅड 2004 पासून एकत्र राहत होते, मात्र, लग्नाचा निर्णय त्यांनी तब्बल 10 वर्षांनंतर घेतला होता. ऑगस्ट 2014मध्ये त्यांच्या विवाहाची बातमी जगभरातल्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजत होती. दोघांना सहा मुलं आहेत. त्यापैकी एक जुळ्यांची जोडी आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा