आज नवी मुंबई-सोलापुरात #एकमराठालाखमराठा

September 21, 2016 8:33 AM0 commentsViews:

vlcsnap-2016-09-18-15h05m22s25521 सप्टेंबर : मराठ्यांच्या मागणीसाठी राज्यात अनेक ठिकाणी मराठा मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. आज नवी मुंबई आणि सोलापूर येथे मराठा मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असून लाखोंच्या संख्येनं मराठा समाजानं उपस्थिती लावाली अशी हाक या आंदोलाकांकडून करण्यात आली आहे. नवी मुंबईत हा मोर्चा उत्सव चौकापासून सुरू होणार असून बेलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार आहे.

तर सोलापुरातही आज मराठा महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे. सकाळी 10 वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. मोर्चात जवळपास 15 लाखांच्या आसपास मराठा समाज बांधव सहभागी होणार असल्याचा दावा मोर्चाच्या समन्वयकांनी केलाय. मोर्चाची सुरुवात सोलापूरच्या वेशीवर असलेल्या संभाजी चौकातून होणार असून होम मैदानात त्याचा राष्ट्रगीताने समारोप होईल. मोर्चासाठी जवळपास पाच हजार स्वयंसेवक मोर्चा सुरळीत पार पडण्यासाठी कार्यरत असणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व 5 तरुणी करणार असून त्यांच्यातर्फे जिल्हाधिका•यांना निवेदन दिलं जाणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा