अलिबागमध्ये खारफुटीवर संकट

April 19, 2010 2:40 PM0 commentsViews: 17

जॉर्ज कोशी, अलिबाग 19 एप्रिललँडमाफियांनी अतिक्रमण केल्याने अलिबागमधील 700 एकर खारफुटी नष्ट झालेली आहे.अलिबाग मुंबईपासून बोटीने केवळ 20 मिनिटांच्या अंतरावर आहे .आतापर्यंत पर्यटकांसाठी स्वर्ग समजला जाणारे अलिबाग आता मात्र स्वर्ग ठरतोय तो लँडमाफियांसाठी. येथली लोकांनी पहिल्यांदा लढा दिला तो आरसीएफविरुद्ध. त्यानंतर नवी मुंबई एअरपोर्ट, खाजगी उद्योजक यांच्याविरुद्ध लढावे लागत आहे. इथे पाणी वाहते राहू नये याची काळजी बिल्डर घेतात. खरे तर मासे खारफुटीच्या मधल्या खाचांमध्ये अंडी घालतात. आणि तिथेच त्यांची वाढ होते. पण आता हे बंद झाले आहे. पण ही केवळ मांडवा येथील स्थिती नाही. तर जवळच्या सालवा भागातील 350 एकर जमीनही अशाच प्रकारे बिल्डरांच्या घशात गेली आहे. तरीही प्रशासन सुस्तच आहे.या भागातील डंपिंग थांबवण्याची आमची इच्छा आहे. पण खारलँड बोर्ड अधिकारांसाठी हटून बसले आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. प्रशासनाच्या अशा उदासिनतेमुळे आतापर्यंत येथील 700 एकर जमीन नष्ट झाली आहे. आणि खारफुटींच्या पुनरुज्जीवनाचा प्रश्न आजही कायम आहे.

close