पंकजा मुंडेंच्या पालघर दौऱ्याचा मार्ग मोकळा,जमावबंदी अखेर मागे

September 21, 2016 9:46 AM0 commentsViews:

Pankaja Munde21 सप्टेंबर :महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंचा पालघर दौ•याआधी जमावबंदी लागू करण्यात आली होती. आता ही जमावबंदी मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे पंकजा मुंडेंचा नियोजित दौरा पूर्ण होणार आहे.

आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या दौ•यादरम्यान झालेल्या गोंधळानंतर पंकजांच्या दौ•यात कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी दक्षता घेत जमावबंदी लागू केली होती. मात्र या आदेशाबाबत चहुबाजुंनी टीका झाल्यामुळे अखेर हा जमावबंदीचा आदेश मागे घेण्यात आलाय. पंकजा भेट देणार असलेल्या खोच आणि कळंबवाडीमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली होती. सकाळी साडे अकरानंतर पंकजा पालघरला पोहोचतील. आणि कुपोषणग्रस्त भागाचा आढावा घेतील.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा