एअर इंडियातही सुट्टीच्या नावाखाली नोकर कपातीचे संकेत

October 16, 2008 3:27 PM0 commentsViews: 12

16 ऑक्टोंबर, मुंबईजेट एअरवेज पाठोपाठ एअर इंडियाही कॉस्ट कटिंगसाठी काही पावलं उचलण्याच्या बेतात आहे. 15000 हजार कर्मचार्‍यांना 3 ते 5 वर्षांची बिनपगारी रजा देण्याचा एअर इंडियाचा विचार आहे. दरम्यान, एअर इंडियात कर्मचारी कपात केली जाणार नाही, असं केंद्रीय हवाई उड्डाणमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी सीएनएन आयबीएनशी बोलताना सांगितलं. गेल्या काही महिन्यांपासून एअर इंडियात बिनपगारी सुट्टी देऊन कर्मचार्‍यांना 3 ते 5 वर्ष बाहेर बसवण्याचा प्रस्ताव आहे.याशिवाय व्हीआरएसचा प्रस्तावही चर्चेत आहे. एअर इंडियांच्या ताफ्यात 146 विमानं आहेत. विमान उद्योगोतील मंदीमुळं खर्च कपातीसाठी मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.अद्याप हा प्रस्ताव विचाराधीन आहे.

close