अकोला महापालिका आयुक्त निलंबित

April 19, 2010 2:46 PM0 commentsViews: 3

19 एप्रिलएकात्मिक घरकुल योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी अकोला महापालिकेचे आयुक्त, उपायुक्त आणि सहआयुक्त यांनी निलंबित करण्यात आले आहे. नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली. आयुक्त गिरिधर कुर्वे, उपायुक्त उमेश कोठीकर आणि सहआयुक्त वैभव आव्हारे यांनी एकात्मिक घरकुल योजनेचे 8 कोटी इतरत्र वळवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. गोपीकिशन भाजोरिया यांनी विधानपरिषदेत हा मुद्दा उपस्थित केला होता.

close