‘चाय पे चर्चा’ पूरे; पाकला सडेतोड उत्तर द्या – उद्धव ठाकरे

September 21, 2016 5:28 PM0 commentsViews:

uddhav_thackery_sppech

 मुंबई – 21 सप्टेंबर :  पाकिस्तानसोबत ‘चाय पे चर्चा’ आता बस झाली. चर्चेऐवजी पाकला त्यांच्या भाषेत सडेतोड उत्तर द्या, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींना सुनावलं आहे.

आज (बुधवारी) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत तीव्र संताप व्यक्त केला.  ते म्हणाले, पाकला त्यांच्या भाषेत सडेतोड उत्तर देण्याची वेळ आली आहे. आपण हल्ला झाला की संतापतो मग थंडं होऊन जातो आणि संताप थंड झाला की तिकडे जाऊन चहा पिऊन येतो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पाकसंदर्भात बोलतांना मोदींना टोला लगावला.

तसंच युद्ध हे देशासाठी व्हावं निवडणुकीसाठी नाही असं ही ते म्हणाले आहेत. निवडणुकीपूर्वी तुम्ही खूप आश्वासने दिली होती. लोकांनी त्याच्यावरच विश्वास ठेवला. आता कुठं गेली ती आश्वासने. आता आपण शांत का बसतोय. एकहाती तुमच्याकडे सत्ता आहे. पाकिस्तानविरोधात कडक धोरण राबवण्याची गरज आहे. लोकांनी मोठ्या विश्वासाने सत्ता हाती दिली आहे हे मोदींनी हे विसरू नये. ती आश्वासने पाळावीच लागतील. देशातील जनता संतापली आहे. पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची गरज असल्याचा सल्ला उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा