तुकाराम मुंढेंना दणका, महापौरांना दिले उद्घाटनाचे अधिकार

September 21, 2016 8:18 PM0 commentsViews:

Tukaram-Mundhe

 नवी मुंबई  – 21 सप्टेंबर : नवी मुंबई महापालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे आणि नगरसेवकांमधील तणाव आणखीनंच वाढत चालला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या उद्घाटनाचे अधिकार फक्त महापौरांनाच देण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. तुकाराम मुंढेंना राजकीय शह देण्यासाठी ही खेळी करण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसात नवी मुंबईमध्ये तुकाराम मुंढेंनी धाडसी निर्णय घेतले. त्यामुळे लोकप्रतिनिधी नाराज आहेत. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे आणि तुकाराम मुंढेंमध्येही संघर्ष झाला तर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईकांनाही घणसोली बस डेपोच्या उद्घटनाला परवानगी दिली नाही. त्यामुळे आता सर्वपक्षीयांकडून तुकाराम मुढेंची कोंडी करण्याचे प्रयत्न करण्यात आलं आहे.

यापूर्वी अनधिकृत बांधकाम प्रकरणावरुन मंदा म्हात्रे आणि तुकाराम मुंढे यांचा वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचला होता. आता पुन्हा एकदा नवी मुंबईत आयुक्तांविरोधात राजकारणी एकटवले असून या सर्वांचा आयुक्त कसा सामना करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा