मराठा आरक्षणावरील सुनावणीस हायकोर्टाचा नकार

September 21, 2016 7:43 PM1 commentViews:

Ekmaratha_highcourt

21 सप्टेंबर :  मराठा आरक्षणाबाबतच्या याचिकेवर सुनावणी करण्यास हायकोर्टानं नकार दिल आहे. ही याचिका दुसऱ्या खंडपीठासमोर दाखल करण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुंबई हायकोर्टात नव्याने याचिका दाखल करण्याचे निर्देश सोमवारी झालेल्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने दिले होते. या प्रकरणी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी महाराष्ट्र सरकारतर्फे दर्शवण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवरील सुनावणीला मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठानं नकार देत तुम्ही दुसऱ्या खंडपीठाकडं याचिका दाखल करा, असे निर्देश दिले. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकेवर अन्य खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. दरम्यान, सरकारतर्फे २७ सप्टेंबरला हायकोर्टात याचिका दाखल करण्यात येणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Akshay Shinde

    मुंबई हायकोर्टाला अडचण काय आहे याचिका दाखल करून सुनावणी दयायला . मला वाटते की त्याना मराठ्या ना आरक्षणं दयायला भिती वाटते आहे.कारण मराठा डोक्याने हुशार असतात ना.