मरीन ऍक्वा झू हटवण्यास स्थगिती

April 19, 2010 2:58 PM0 commentsViews: 2

अलका धुपकर, मुंबई19 एप्रिलदादर येथील महात्मा गांधी स्विमींग पुलाच्या रिनोव्हेशनचे काम बीएमसीने सुरू केल आहे. पण या प्रकल्पाचा एकूण खर्च, रिनोव्हेशनअंतर्गत स्विमींग पुलच्या रचनेमध्ये केले जाणारे बदल आणि तिथे बांधण्यात येणारी इमारत याबाबत बीएमसी कुठलीच माहिती पारदर्शीपणे देत नाही. तसेच स्विमींग पुलाच्या बाजूला असलेले मरीन ऍक्वा झू हटवण्याचा निर्णय बीएमसीने घेतला आहे. पण मत्स्यतज्ज्ञ नंदकुमार मोघे यांनी या निर्णयाला सत्र आणि दिवाणी कोर्टात आव्हान दिले. आता हे ऍक्वा झू हटवण्याला सिव्हील कोर्टाने स्थगिती दिली आहे. 21 एप्रिलला पुढची सुनावणी होणार आहे.1985 पासून दादरच्या शिवाजीपार्कशेजारी हे मरीन ऍक्वा झू आहे. ते चालवलं जाते, वाईल्ड लाईफ वॉण्डरर्स नेचर फाऊंडेशन तर्फे. इथे अनेक देशांतील दुर्मिळ मासे आहेत. या मरीन ऍक्वा झूच्या बाजूलाच सुरू आहे, महात्मा गांधी स्विमींग पुलाचे नवे बांधकाम. त्याचा फटका या माशांना बसत आहे.जादा एफएआय मिळवण्यासाठी बीएसमीने अगोदरच विकसित केलेले प्लॉट स्विमींग पुलाच्या प्रकल्पात असे सादर केले आहेत. पण कोर्टाने मरीन ऍक्वा झू हटवण्याच्या बीएमसीच्या निर्णयालाच स्थगिती दिली आहे. त्यामुळे स्विमींग पुलाच्या प्रकल्पावर आता प्रश्नचिन्ह लागले आहे.

close