काश्मीर प्रश्नावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत भारत-पाकमध्ये शांतता नाही – नवाज शरीफ

September 22, 2016 11:37 AM1 commentViews:

Nawaz shariff

21 सप्टेंबर : पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आपल्या उलट्या बोंबा कायम ठेवल्या आहेत. काश्मीरवर तोडगा निघेपर्यंत भारताशी समेट अशक्य आहे, अशी बोंब त्यांनी संयुक्त राष्ट्र संघात ठोकली. तसंच, यावेळी त्यांनी दहशतवादी बुरहान वाणीचा उल्लेख काश्मीरचा ‘युवा नेता’ असा केला.

शरीफ यांनी काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्र संघाच्या व्यासपीठावर रेटताना भारतीय सैन्य दलावरही गंभीर आरोप केलं आहेत. त्यांनी दहशतवादी बुरहान वाणीला काश्मीरचा युवा नेता संबोधून, भारतीय सैन्याने त्याची हत्या केल्याचा आरोप केला.

तसंच जोवर काश्मीर प्रश्नावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत भारत-पाकमध्ये शांततापूर्ण नातं तयार होऊ शकत नाही आणि भारत-पाकिस्तानमध्ये समेटही होऊ शकत नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

दुसरीकडे भारतीय सैन्य काश्मीरमध्ये मानवी हक्काची उल्लंघन करत असल्याची गरळही त्यांनी ओकली. शिवाय, काश्मीरमधून कर्फ्यू हटवण्याची मागणी करत, काश्मीरमधील प्रत्येक हत्येची संयुक्त चौकशी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Satish Bhangaonkar

    P M OF PAKISTHAN HAS HIMSELF ADMITTED THAT WHATEVER ATTACKS DONE ON INDIA BY TERRORIST BY CONSULTING TO HIM AND HIMSELF HAS PROVED THAT THEY ARE BACKING TO TERRORIST. WHAT OTHER PROF ID REQUIRED