मोबाइलवरून करा तिकीट बुक

April 19, 2010 3:15 PM0 commentsViews: 56

प्रीती खान, आसनगाव19 एप्रिलमुंबईत प्रवास करायचा म्हणजे ताटकळावे लागते, लांबच लांब रांगाममध्ये. मग तो बस स्टॉप असो, रिक्शा असो, नाही तर रेल्वे तिकीटाची रांग. हा रांगांचा प्रश्न सोडवण्यासाठी आसनगावच्या जोंधळे पॉलिटेक्निकच्या विद्यार्थांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी चक्क मोबाइलवरून तिकीट बुक करण्याचे सॉफ्टवेअर तयार केले आहे. तिकीटाची रांग, स्मार्ट कार्डची कटकट या सगळ्या बाबीटाळण्यासाठी मोबाईलचा उपयोग करता येईल का, असा विचार दररोज आसनगाव ते ठाणेदरम्यान प्रवास करणार्‍या प्रसाद पाटील या पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्याच्या मनात आला. तो आणि त्याच्या मित्रांनी त्यावर विचार सुरू केला. आणि त्यातून आकाराला आला तिकीट मिळवून देणारे मोबाईल रेल टिकीटींग प्रोजेक्ट.त्यासाठी सामुग्री लागली, एक सर्व्हर, एक ऑपरेटींग डिस्क आणि काही युझर मोबाईल. या रेल तिकीटींग मॉडेलमध्ये मोडेमचे काम चार ते पाच हजारांचा मोबाईल करतो. या मोबाईलद्वारे 1 मिनिटात 200 तिकीटे बुक करता येतात. एसएमएसद्वारे हे तिकीट बुकिंग करता येते. यासाठी रेल्वेकडे आपला मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आणि स्मार्ट कार्डचा वापर करत तिकिट काढायचे, असा सोपा फंडा आहे. मोबाईलवरच तिकिट मिळाल्याचा एसएमएसही येतो. मोबाईल रेल तिकीटाच्या या प्रोजेक्टला राज्यआणि राष्ट्रीय पातळीवर बक्षिसे मिळाली आहेत. आता हे विद्यार्थी वाट पाहत आहेत, रेल्वे प्रशासन त्यांची कधी दखल घेते त्याची…

close