ठाण्यात वाहतूक पोलिसाची रिक्षाचालक आणि प्रवाशाला मारहाण

September 22, 2016 12:51 PM0 commentsViews:

 thane_police

ठाणे, 22 सप्टेंबर : राज्यभरात पोलिसांना नागरिकांकडून मारहाण करण्याच्या घटना सुरू असतानाच ठाण्यात मात्र वाहतूक शाखेच्या पोलिसाने वाहतुकीचा खोळंबा केल्याबद्दल रिक्षाचालकाला मारहाण केलीये. सदरचा प्रकार एका नागरिकाने पाहिल्यावर त्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र या पोलिसाने त्याला देखील मारहाण केली. ठाण्यातील नितीन कंपनी परिसरात ही घटना घडलीये. या प्रकरणी पोलिसाविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीये.

एकीकडे पोलिसांना मानहानीचे प्रकार सर्वत्र सुरू असताना आता पोलिसांकडून सर्वसामान्यांना मारहाण केल्याची घटना घडलीये. ठाण्यातील नितीन कंपनी सिग्नलवर रिक्षाचालकाला वाहतूक पोलिसाने मारहाण केल्यानंतर हा प्रकार पाहणा•या प्रवाश्याने सदरचा प्रकार पहिला होता याचाच राग मनात धरून सागर खुस्पे याला मारहाण केली सागर खुसपे हे ठाणे येथील वागळे इस्टेट येथे राहतात. नितीन कंपनीच्या सिग्नल जवळ कर्तव्यावर असणा•या सागर ढोणे या पोलीस शिपायाने रिक्षावाल्याला थांबवल्यानंतर रिक्षाचालकाला मारहाण केल्यानंतर सदरचा प्रकार पाहणा•या सागरने पोलिसांनीच रिक्षावाल्याला मारल्याचं सांगताच सागर खुसपे या प्रवाश्याला ढोणे यांनी देखील मारहाण केली. दरम्यान या प्रकरणी सागरने नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या बाबत ठाणे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब गीते यांना विचारणा केली असताना सदरचा प्रकार घडला नसून सदरच्या रिक्षाचालकाने पोलिसाला मारहाण केल्यामुळे वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं सांगितलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा