सिद्धूंची ‘द कपिल शर्मा शो’मधून एक्झिट, नवा ‘गुरू’ कोण ?

September 22, 2016 2:12 PM0 commentsViews:

sidhu_kapil22 सप्टेंबर : नवज्योत सिंग सिद्धू म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके सिद्धूपाजींनी द कपिल शर्मा शोला रामराम ठोकलाय. पंजाबमध्ये सुरू केलेल्या ‘आवाज-ए-पंजाब’ या आपल्या पक्षाचं पूर्णवेळ काम करण्यासाठी सिद्धू यांनी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

नवज्योत सिंग सिद्धू आणि कपिल यांची जोडी छोट्या पडद्यावर कमालीची यशस्वी ठरली होती. कॉमेडी नाईट्स विथ कपिल आणि आता द कपिल शर्मा शोमध्ये सिद्धुू यांचा सहभाग कार्यक्रमाचा एक भागच बनला होता. ठोको ताली आणि शेरोशायरी सिद्धूची कार्यक्रमाला ‘चार चाँद’ लावत होते. सिद्धू आणि कपिलची टीम यांचे चांगले संबंध होते. पंजाबच्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर सिद्धू यांनी भाजपला रामराम ठोकत स्वत:चा पक्ष आवाज ए पंजाब स्थापन केला आहे. त्यामुळे पक्षाला पूर्ण वेळ देण्यासाठी कपिलच्या शोमधून एक्झिट घेतलीये. आता सिद्धूंच्या खुर्चीवर कोण विराजमान होणार याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा