जव्हारमध्ये शेतकऱ्याने फुलवली जरबेराची शेती

September 22, 2016 2:47 PM0 commentsViews:

विजय राऊत, जव्हार, 22 सप्टेंबर : शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणं महत्त्वाचं असतं. पीकांमध्ये बदल करणं आणि अधिक उत्पन्न देणा•या पिकांकडे वळणं काळाची गजर आहे. हीच गरज ओळखून जव्हार तालुक्यातल्या हरिशचंद्र भोये या शेतक•ऱ्यानं पॉलिहाऊसच्या माध्यमातून जरबेराची शेती फुलवलीय.

ही सुंदर आणि दिमाखात डौलणारी फुलं आहेत जव्हारच्या चालतवाड गावातल्या हरिशचंद्र भोये यांच्या शेतातली. हरिशचंद्र भोये शिक्षकाची नोकरी करता करता शेतीतही रमलेत. त्यांनी आपल्या 20 गुंठ्यात पॉलिहाऊसच्या माध्यमातून जरबेरा फुलांची लागवड केलीय.

jarberaबाजारात कशाची मोठी मागणी आहे. याचा अभ्यास करून फुलांची लागवड हरिशचंद्र यांनी केलीय. मार्केटमध्ये जरबेराला असलेली मोठी मागणी लक्षात घेऊन त्यांनी आपल्या शेतात जरबेराची लागवड करण्याचा निर्णय घेतला. या पिकातून त्यांना 30 ते 35 हजार रुपयांचं महिन्याला उत्पन्न मिळतंय.

जव्हार तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. मात्र खर्च जास्त आणि उत्पन्न कमी असल्यानं शेतकरी आर्थिक संकटात येतात. मात्र काळानुसार पीक आणि पिक पद्धत यांच्यात बदल केली तर यश नक्की मिळतं हे हरिश्चंद्र भोये यांनी दाखवून दिलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा