एका स्वयंपूर्ण गावाच्या समृद्ध शेतकऱ्यांची यशोगाथा !

September 22, 2016 3:01 PM0 commentsViews:

विजय राऊत, जव्हार, 22 सप्टेंबर : जव्हार तालुक्यातलं वनवासी हे एक आदिवासी गाव..आदिवासी गाव असलं तरी हे संपूर्ण बागायती आहे. अगोदर या गावचा उदरनिर्वाह वनसंपत्तीच्या आधारावर चालत होता. मात्र आता हे गाव स्वयंपूर्ण झालंय. इथला आदिवासी शेतकरी समृद्ध झालाय. आणि गावकरीही महिन्याला बैठक घेऊन चांगला प्रयोग करणा•ऱ्या शेतक•याचं कौतुक करतात.

निसर्गाच्या कुशीत झाडाझुडपांमध्ये वसलेलं हे जव्हार तालुक्यातलं हे वनवासी गाव.. आजुबाजुला हिरवेगार डोंगर आणि वा•याच्या झुळुकेवर ताल धरणारी नारळाची झाडं… वनवासी गावच्या परिसरावर एक नजर फिरवली की या गावची समृद्धी आपल्या लक्षात येईल. या गावात तुम्हाला केळी, नारळ, आंबा, चिकू, पपई अशा अनेक फळबागा पाहायला मिळतील.javhar_story

वनवासी गावातले शेतकरी गणपत गावंडा यांनी तर आपल्या शेतात चक्क काळ्यामिऱ्यांची लागवड केलीय. या काळ्यामि•यांचे वेल त्यांनी नारळाच्या झाडांवर चढवलेत. नारळाच्या आळ्याभोवती अननसाची लागवड करण्यात आलीय. कमी जागेत आणि कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न कसं घ्यायचं हे आपल्याया गणपत गावंढा यांनी दाखवून दिलंय.

वनवासी या गावात मोग•याचीही सर्वात जास्त लागवड केली जाते. या गावातून हंगामामध्ये दिवसाकाठी जवळपास 2 ते 3 क्विंटल मोग•याचं उत्पन्न घेतलं जातं. दादर मार्केटमध्ये या मोग•याला चांगली मागणीही आहे.

याच गावातले दुसरे शेतकरी काशिनाथ गावित.. गावित यांनी आपल्या शेतात केळीची लागवड केलीय. तर विविध जातीच्या आंब्यांची कलम ते आपल्या शेतात स्वतः तयार करतात. गावित यांना फक्त आंब्यांच्या कलमांपासून वर्षाला 4 ते 5 लाखांचं उत्पन्न मिळतंय. तर केळीपासून त्यांनी 2 ते 3 लाखांचं उत्पन्न मिळतंय. विशेष म्हणजे काशिनाथ गावित यांचं सगळं कुटुंब त्यांना शेताच्या कामामध्ये मदत करतंय.

कोणत्याही एका पिकावर अवलंबुन न राहता बहुपिक पद्धतीचा अवलंब केला तर शेतक•याला नक्कीच फायदा मिळेल. एका पिकातून जर नुकसान झालं तर ते दुस•या पिकातून शेतक•ऱ्यांना भरून काढता येऊ शकता. या बहुपिक पद्धतीचा आदर्श जव्हारच्या या वनवासी गावाने घालून दिलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा