मंत्रालयाच्या गेटवर एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

September 22, 2016 8:46 PM0 commentsViews:

1mumbai_mantralyatमुंबई, 22 सप्टेंबर : मंत्रालयासमोर एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. मंत्रालयाच्या गेटबाहेरची ही घटना आहे. वेणू पिल्लई असं आत्महत्या करणा•याचं नाव असून तो पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळं अनर्थ टळला.

वेणू पिल्लई हा काचपाडा, मालाडचा रहिवासी आहे. त्याने बिल्डर आहुजा कंन्स्ट्रक्शनच्या विरोधात तक्रार केली होती. वेणू याने अंगावर रॉकेल टाकून घेऊन स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधानपणा दाखवल्यामुळे त्याचे प्राण वाचले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा