आरोग्यमंत्र्यांची 3 किमी पायपीट

September 22, 2016 10:00 PM0 commentsViews:

22 सप्टेंबर : मुंबई अहमदाबादला जोडणारा वर्सोवा पूल बंद पडल्यानं शिळफाटा परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. याचा फटका राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनाही बसला. तीन तासांसाठी दीपक सावंत ट्रॅफिकमध्ये अडकले होते. त्यामुळे शेवटी वैतागून त्यांनी चालत जाणं पसंत केलं. 3 किलोमीटरपर्यंत आरोग्यमंत्री चालत गेले. या पायपीटीनंतर सावंत यांनी खारेगाव टोलनाक्यावर दुपारी चारपर्यंत टोलमुक्ती देण्याची घोषणा केली आहे..


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा