आयपीएलची होणार चौकशी

April 19, 2010 5:48 PM0 commentsViews: 11

19 एप्रिलआयपीएलमधील सर्वच व्यवहारांची कसून चौकशी केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज संसदेत स्पष्ट केले. संबंधित विभागांनी आयपीएलची चौकशीही सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान इन्कम टॅक्स विभागाने आयपीएलला नोटीस बजावली आहे. सर्व टीम्सच्या लिलावांची कागदपत्रे सादर करायला इन्कम टॅक्सने सांगितले आहे. त्यासाठी आयपीएलला शुक्रवारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. चंदीगडमधील आयकर विभागाने किंग्ज एलेव्हन पंजाबची चौकशी सुरू केल्याचे समजते. दरम्यान मुंबई इन्कम टॅक्स विभागाने बीसीसीआयला नोटीस बजावली आहे. 20 एप्रिलपर्यंत या नोटीशीला उत्तर देण्यास सांगितले गेले आहे. बीसीसीआयच्या टॅक्सचीही चौकशी सुरू असल्याचं समजते आहे. त्याचा अहवाल 12 ते 14 आठवड्यांत तयार होणार आहे.लोकसभेत गोंधळ आयपीएलच्या मुद्द्यावरून आज लोकसभेत चांगलाच गोंधळ झाला. आयपीएलवर बंदी घालण्याची मागणी विरोधकांना केली. सर्वच पक्षांनी हा मुद्दा लावून धरला. तर आयपीएल हा स्वीस बँकेतल काळा पैसा पांढरा करून आणण्याचे माध्यम आहे, असे गोपीनाथ मुंडे म्हणाले.थरूर यांनी काल राजीनामा दिला होता. तो काँग्रेस श्रेष्ठींनी तातडीने मंजूरही केला. आयपीएलच्या कोची टीमसंबंधातल्या व्यवहारांप्रकरणी थरूरयांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. शशी थरुर यांच्यानंतर आता आयपीएलचे संचालक ललित मोदी यांचीही विकेट जाणार, असे समजतेसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय ललित मोदींना आयपीएलच्या संचालक पदावरुन हटवणार आहेयाच संदर्भात 23 एप्रिलला म्हणजे शुक्रवारी बीसीसीआयची मिटींग होणार आहे23 एप्रिलच्या मिटींगमध्ये फ्रेंचाईझींच्या मालकांनाही हजर राहण्यास सांगण्यात आले आहेपण ललित मोदींना या बैठकीत बोलावण्यात आलेले नाही 26 एप्रिलला बीसीसीआय मोदींची उचलबांगडी करेल, असे समजतेजर मोदींनी राजीनामा द्यायला नकार दिला तर बीसीसीआय स्पेशल ऍन्युअल जनरल मिटींग बोलावून त्यांच्यावर कारवाई करेल, अशीही बातमी आहे.

close