अहमदनगरमध्ये आज मराठा क्रांतीचा मोर्चा

September 23, 2016 8:34 AM0 commentsViews:

maratha_marorchaअहमदनगर, 23 सप्टेंबर : अमरावतीत मराठा क्रांतीचा एल्गार केल्यानंतर आज अहमदनगरमध्ये मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. या मोर्चासाठी आज मोठ्या प्रमाणावर मराठा समाज नगरमध्ये एकवटेल असा अंदाज आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीमध्ये घडलेल्या घटनेनंतर मराठा समाजात त्याची प्रतिक्रिया उमटली होती. त्यानंतरच मराठा समाजाने या घटनेचा निषेध करण्यासहीत आपल्या मागण्यांसाठी जागोजागी मूकमोर्चे काढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिशय शिस्तबद्ध रितीने मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा नेत्याच्या पाठिंब्याशिवाय हे मोर्चे काढण्यात आले. त्यामुळे मराठा समाजाच्या मनातील भावना या मोर्चातून उमटली. त्यामुळे सगळ्यांनाच या मोर्चांची दखल घेणं भाग पडलं. आज मराठा समाज अहमदनगरमध्ये एकवटणार असल्याने हेच चित्र आज पुन्हा एकदा पहायला मिळेल अशी शक्यता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा