पाकचं डोकं तापेल, आता भारतात येणार ‘राफेल’ !

September 23, 2016 9:01 AM0 commentsViews:

23 सप्टेंबर : काश्मिर प्रश्नी आदळआपट करणाऱ्या पाकिस्तानाला आता चांगलीच धडकी भरणार आहे. भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात आला मिसाईल फायटर ओळखला जाणारे राफेल विमान येणार आहे. या खरेदीच्या कराराला मंजुरी मिळाली असून आज या करारावर दोन्ही देशांकडून शिक्कामोर्तब केलं जाणार आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि फ्रान्सचे संरक्षणमंत्री वेस ड्रायन जीन यांच्या उपस्थितीत सह्या होणार आहेत.

rafelभारताचे 2007 सालापासून फ्रान्सकडून अत्याधुनिक मिसाईल्स असणारे राफेल विमान खरेदी करण्याचे प्रयत्न केले जात होते. मात्र काही अडचणींमुळे या करारात अडथळा येत होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागील वर्षी फ्रान्स दौ•ऱ्यानंतर या खरेदीला वेग आला आणि मोदींना भारत फ्रान्सकडून 36 फायटर जेट्स खरेदी करणार असल्याची घोषणा केली.

या कराराअंतर्गत भारत फ्रान्सकडून 36 राफेल लढाऊ विमानांची खरेदी करणार असून त्यांची किंमत 59 हजार कोटी रूपये आहे. गेल्या 20 वर्षात लढाई विमान खरेदी करण्याचा हा पहिलाच निर्णय आहे. या विमानातील अत्याधुनिक मिसाईल्समुळे वायूसेनेला फायदा होणार आहे. भारतीय वायू सेनेच्या ताफ्यात हे विमान दाखल होण्यासाठी जवळपास 18 महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

विशेष म्हणजे, यूपीए सरकारच्या काळात फ्रान्सकडून 126 राफेल विमान खरेदीचा निर्णय झाला होता. यापैकी 36 विमान राफेल विमान बनवणारी कंपनी दसाल्ट एव्हिएशनकडून खरेदी करण्यात येणार होते. तर उर्वरित 90 विमान भारतात तयार केले जाणार होते. मात्र पंतप्रधान मोदींनी जुना करार रद्द करत नव्याने खेरदीचा निर्णय घेतला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा