करीनाच्या वाढदिवसाला सैफच्या मुलीची हजेरी

September 23, 2016 9:44 AM0 commentsViews:

21 सप्टेंबर रोजी सैफअली खानने त्याच्या राहत्या घरी मुंबईत आपली पत्नी करीना हीच्या वाढदिवसाची पार्टी दिली.या पार्टीला बॉलिवुडमधील अनेक बड्या हस्तींनी हजेरी लावली होती.मात्र त्या सगळ्यात लक्ष वेधून घेतले ते ,सैफ अली खानची मुलगी सारा हिने.

ह्या पार्टीची शान अगदी ‘नवाब कुटुंबा’ला साजेशीच होती.सारा ह्या पार्टीत नवीन स्लिम लुकमध्ये दिसली.करीनाच्या ह्या बर्थ-डे पार्टीत तिची बहीण करिश्मा कपुरने सुद्धा हजेरी लावली होती.रणबीर कपुरसुद्धा बहिणीच्या वाढदिवसाला आला होता. सैफ स्वत: घरासमोर पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी हजर होता. ह्या पार्टीला करीनाची जवळची मैत्रीण मलाईका आणि अमृता अरोरा आल्या होत्या. संपूर्ण खान कुटुंबीय ह्या पार्टीत दिसले. सोहा अली खानचा पती कुणाल खेमुसुद्धा पार्टीत दिसला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा