उरणमध्ये ‘त्या’ बोटीचा संशयितांशी संबंध नाही !

September 23, 2016 1:33 PM0 commentsViews:

uran_boatरायगड, 23 सप्टेंबर : उरणमध्ये पाच संशयित घुसल्यामुळे खळबळ उडाली आहे. या संशयितांचा शोध सुरू आहे. मात्र मोरा बंदराजवळ सापडलेल्या बोटीचा आणि संशयिताचा कोणताही संबंध नाही असं आता स्पष्ट झालंय.

उरणमध्ये मोरा बंदराजवळ सापडलेल्या बोटीबद्दल संदिग्धता निर्माण झाली होती. 7 सप्टेंबर रोजी मोरा बंदरात ही बोट बेवारसरित्या सापडली होती. त्यानंतरच उरणमध्ये पाच संशयित दहशतवादी आढळल्यामुळे त्यांचा या बोटीशी काही संबंध आहे का याबाबत तर्क वितर्क लढवले जात होते. मात्र या बोटीचा या संशयितांशी काहीही संबंध नसल्याचं राज्याच्या गृहविभागाने स्पष्ट केलंय.

ही बोट स्थानिक मच्छिमारांची होती. या बोटीतून चौघेजण जात असल्याना कस्टम अधिका•यांनी त्यांना हटकलं त्यानंतर ते ही बोट तिथेच सोडून पळून गेले. या बोटीचा वापर डिझेलची चोरी करण्यासाठी होत असल्याचं नंतर स्पष्ट झालं. त्यामुळे त्याचा उरणमध्ये दिसेलल्या व्यक्तींशी काहीही संबंध नाही हे आता स्पष्ट झालंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा