परशुराम घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

September 23, 2016 4:35 PM0 commentsViews:

mUMBAI - GOA HIGHWAY

23 सप्टेंबर : मुंबई, कोकणासह राज्यात गेल्या ४ दिवसांपासून सर्वदूर पाऊस पडतो आहे. चिपळूणजवळच्या परशुराम घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली.

मुंबई कोकणात दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. चिपळूणजवळ परशुराम घाटात दरड कोसळल्याने खेड ते चिपळूण दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक मध्यरात्री पासून ठप्प आहे. इथल्या डोंगराचा काही भाग महामार्गावर कोसळला आहे. दरड हटवण्याच काम सुरू असून या मार्गावरची वाहतूक थांबवण्यात आली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा