कोलकात्याची बाजी

April 20, 2010 10:26 AM0 commentsViews: 2

20 एप्रिलआयपीएलच्या तिसर्‍या हंगामाची विजयाने सुरुवात करणार्‍या कोलकाता नाईट रायडर्सने शेवटही विजयानेच केला. आयपीएलच्या शेवटच्या लीग मॅचमध्ये नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा 9 विकेट राखून पराभव केला. मुंबईने सेमीफायनलमध्ये याआधीच प्रवेश केल्याने या मॅचसाठी प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. सचिन तेंडुलकरच्या अनुपस्थितीत ड्वेन ब्राव्होने कॅप्टनपदाची धुरा सांभाळली. पण टीमला मोठा स्कोअर करता आला नाही. 8 विकेट गमावत मुंबईने फक्त 133 रन्स केले. सौरभ तिवारीने सर्वाधिक 46 रन्स केले. विजयाचे हे माफक आव्हान कोलकाताने फक्त 1 विकेट गमावत पार केले. सौरव गांगुली आणि ब्रँडम मॅक्युलमने पहिल्या विकेटसाठी 97 रन्सची पार्टनरशिप केली. गांगुली 42 रन्सवर आऊट झाला. पण मॅक्युलमने 57 रन्सची नॉटआऊट इनिंग खेळत टीमला विजय मिळवून दिला. कोलकाता नाईट रायडर्सने विजय मिळवला असला तरी त्यांना सेमीफायनल मात्र गाठता आलेली नाही

close