अखेर भारत-फ्रान्समध्ये राफेल विमान खरेदी करार

September 23, 2016 7:43 PM0 commentsViews:

23 सप्टेंबर : भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात फ्रान्समधील बहुप्रतिक्षित राफेल विमान अखेर दाखल होणार आहे. भारत आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांनी दिल्लीत राफेल करारावर आज (शुक्रवारी) स्वाक्षरी केली आहे. राफेल करारानुसार पुढील 5 वर्षांत भारताला फ्रान्सकडून 36 लढाऊ विमान मिळणार आहेत.

Rafel_news

भारत आणि फ्रान्समध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राफेल करारावर चर्चा सुरू होती. भारताचे 2007 सालापासून फ्रान्सकडून अत्याधुनिक मिसाईल्स असणारे राफेल विमान खरेदी करण्याचे प्रयत्न केले जात होते. मात्र या करारात दलालांचा सहभाग असल्याचे आरोप होऊ लागले आणि या कराराविषयी संभ्रम निर्माण झाले. शेवटी मोदी सरकारने सत्तेत आल्यावर विमान निर्माण करणार्‍या कंपनीऐवजी फ्रान्स सरकारसोबत करार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागच्या वर्षीया फ्रान्स दौर्‍यानंतर या खरेदीला वेग आला आणि भारत फ्रान्सकडून 36 फायटर जेट्स खरेदी करणार्‍यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

शुक्रवारी दिल्लीत भारत आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांनी राफेल विमानासाठी करार केला. 7.8 बिलियन यूरोमध्ये हा करार करण्यात आला आहे. पुढील 5 वर्षांत 36 राफेल विमान भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होतील. हवेतूनच जमिनीवर अचूक निशाणा साधणार्‍या या विमानांमुळे भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यात
निश्चितच भर पडणार आहे. या विमानांमुळे हवाई दलाला भारताच्या हद्दीत राहुनच पाकिस्तानवर निशाणा साधणं सहज शक्य होऊ शकेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा