उरणमधील सर्च ऑपरेशन संपलं, नौदलाची माहिती

September 23, 2016 9:34 PM0 commentsViews:

uran search opration

23 सप्टेंबर : रायगडमधील उरण शहरात संशयित तरुणांना शोधण्यासाठी राबवण्यात आलेली शोध मोहीम संपल्याचं नौदलाकडून जाहीर करण्यात आलं आहे. पण संशयितांना शोधण्यासाठी स्थानिक पोलिसांकडून तपास यापुढेही सुरूच राहणार असल्याचं नौदलानं स्पष्ट केलं आहे.

उरण शहरात 4-5 संशयित तरूण दिसल्याची माहिती समोर आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून नौदलाकडून या भागात सर्च ऑपरेशन राबविण्यात आलं होतं. दोन विद्यार्थ्यांनी बंदुकधारी पाहिल्याची माहिती दिली होती. त्यानंतर सर्व सुरक्षा यंत्रणाना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मुंबई-ठाण्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला होता तसेच मुंबई पोलिसांकडून उरणमधील दोन संशयितांची रेखाचित्र जारी करण्यात आली होती.

उरण हा अतिसंवेदनशील भाग असल्याने मुलांच्या माहितीच्या आधारे सर्च ऑपरेशन राबवण्यात आले होते. परंतु दोन दिवसांनंतरही तपास पथकाच्या हाती काहीच न लागल्यामुळे हे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलं आहे. उरणमध्ये सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलं असलं तरी स्थानिक पोलीस यापुढेही तपास करणारच असल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा