वाढदिवशी भेटवस्तू नको; जवानांना मदत करा – लता मंगेशकर

September 23, 2016 10:10 PM0 commentsViews:

Lata Mangeshkar1312

23 सप्टेंबर : माझ्या वाढदिवसाला भेटवस्तू देऊ नका, त्याऐवजी माझ्या चाहत्यांनी भारतीय सैन्याच्या निधीत योगदान देण्यासाठी आर्थिक मदत करावी, असं आवाहन गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांनी केलं.

लता मंगेशकर यांचा येत्या 28 सप्टेंबरला जन्मदिवस आहे. त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने लता मंगेशकर यांनी सीमेवर लढताना शहीद होणाऱ्या जवानांच्या मदतीसाठी निधी उपलब्ध करण्यात यावा, यासाठी त्यांनी नवा संकल्प केला. त्यांनी आपल्या देशवासियांनी मोठ्या हाताने मदत करण्याचे आवाहन लता मंगेशकर यांनी केलं.

याबाबत त्यांनी ट्विटरवर आपले मत नोंदवले. त्या म्हणाल्या, मी भारतीय लष्कारातील जवानांना मदत करण्यासाठी ‘आर्मी वेलफेअर बॅटल कॅज्युअल्टीजमध्ये माझ्या परीने काही रक्कम जमा करणार आहे. माझ्या जन्मदिवसाला हजारोंच्या संख्येने फूल, मिठाई, ग्रिटिंग कार्ड पाठवता. मात्र, आता यावेळी मला भेट वस्तू न पाठवता ती रक्कम वीर जवानांसाठी द्या, असे आवाहन त्यांनी केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा