कोल्हापूर शहरात रस्त्यांची दुर्दशा

October 16, 2008 3:37 PM0 commentsViews: 5

16 ऑक्टोंबर, मुंबईदिवाळीच्या ऐन तोंडावर कोल्हापूर शहरातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. कोल्हापुरवासीय जीव मुठीत धरुन या खड्‌ड्यातून वाट काढतात. रोज प्रवास करीत असतात. 220 कोटींचा रस्ते विकास प्रकल्प होण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोणतीही उपाययोजना होऊ शकलेली नाही. ' कोल्हापूरच्या रस्त्याची अवस्था वाईट आहे. रस्ता कुठं, खड्डे कुठं लक्षात येत नाही. याकडे प्रशासन गाभीर्यांनं लक्ष देत नाही. परवाच मी गाडीवरुन पडलो. समोर एखादी एस.टी किंवा गाडी आली असती, तर मी मरता-मरता त्यातनं वाचला', असं शिक्षक अनंत यादव यांनी सांगितलं. याप्रश्नी महापालिकेनं सरकारी उत्तर दिलं. ' दसर्‍यानंतर बर्‍याच कालावधीपर्यंत सर्वसाधारणपणे आठ दिवसांमध्ये पॅचवर्कचं प्लॅट रिपेअर करुन सुरू करण्याची व्यवस्था केलेली आहे. एक कोटीचं नियोजन केलेलं आहे.प्रमुख रस्त्याचं पॅचवर्क तर आपण कमीत कमी काळात सुरू करतोय' , असं पालिका शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितलं. कोल्हापूर शहरात साधारणपणे 600 किलोमीटरचे रस्ते आहेत. जवळपास सर्व रस्त्यांची अवस्था अशीच आहे.

close