शुगर आणि किडनीच्या उपचारासाठी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री सिंगापूरला जाणार

September 24, 2016 4:14 PM0 commentsViews:

jayalalitha-asks-labour-unions

24 सप्टेंबर : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना उपचारासाठी सिंगापूरला नेणार आहेत. गेल्या 2 दिवसांपासून चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दिवसांपासून त्या उपचार घेत आहेत.

 जयललिता यांना किरकोळ आजार झाल्याचं जरी सांगितलं जात असलं, तरी त्यांना सीविअर डायबेटीस आहे. तसंच सध्या त्यांना किडनीचा त्रास सुरू झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एक किडनी निकामी झाल्याचीही माहिती समोर येतेय, पण याची पुष्टी होऊ शकलेली नाही. मात्र, आजार लवकर बरा होत नसल्याने अम्मा आता उपचारासाठी सिंगापूरला रवाना होणार आहेत. तसंच, त्यांना रक्तदाब आणि हायपर-टेंशनचाही त्रास आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा