‘ऐ दिल है मुश्किल’चं ट्रेलर रिलीज

September 24, 2016 7:55 PM0 commentsViews:

दिवाळीत रिलीज होणार्‍या ए दिल है मुश्किल या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. नुकताच या चित्रपटाचं ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा ट्रेलर तरुणांना भलताच आवडलेला दिसतोय. आतापर्यंत  या  चित्रपटाचे शीर्षक गीत आणि बुल्लेया ही दोन गाणी प्रक्षकांच्या भेटीस आली असून ते ही प्रचंड लोकप्रिय झाली आहेत. आता या गाण्यांच्या तोडीस तोड असा हा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

मैत्रीत निर्माण झालेले एकतर्फी प्रेम त्यामधून आलेला दुरावा आणि दोन व्यक्तिंमध्ये आलेली तिसरी व्यक्ती यावर हा ट्रेलर भाष्य करतो. त्याशिवाय, ऐश्वर्याचा हॉट अंदाज सगळ्यांनाच भूरळ पाडणारा आहे. या चित्रपटातील तिच्या लुकचीही जबरदस्त चर्चा आहे. आताची गोष्ट सांगायची तर, चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या संपुर्ण टिम बिझी आहे. पण ऐश्वार्या काही ठराविक इव्हेंट सोडले तर मुंबईबाहेर प्रमोशनसाठी जाणार नाही, असं तिनं सांगितलं आहे. आणि याचं कारण आहे तिची मुलगी आराध्या. तिची ही अट या चित्रपटाचा लिखक-दिग्दशिर्त करण जोहरनं ते मान्यही केलंय. पण प्रेक्षक, मीडिया ऐश्वर्याला नक्कीच मिस करतील.

 

 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close