भारत दहशतवादापुढे कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही – मोदी

September 24, 2016 8:23 PM0 commentsViews:

Narendra modi banner123

24 सप्टेंबर :  पाकिस्तान सातत्याने भारतावर दहशतवादी हल्ला करीत आहे. पाकिस्तानने आत्तापर्यंत भारतावर 17 वेळा असा हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही व येणारही नाही. भारत दहशतवादापुढे कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानला ठणकावले.

केरळमधील कोझिकोड इथल्या भाजप राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत मोदी बोलत होते. या वेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय शहर विकासमंत्री वेंकय्या नायडू, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरुन मोदींनी पाकिस्तानाला चांगलेच खडेबोल सुनावले. मोदी म्हणाले, देशात आत्तापर्यंत अनेक दहशतवादी हल्ले करण्यात आले. या प्रत्येक दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असतोच. उरीमध्ये घडवण्यात आलेला दहशतवादी हल्ला भारत कधीही विसरणार नाही, हे दहशतवाद्यांनी कान उघडे ठेवून ऐकावं.

पाकिस्तान चारही बाजूंनी दहशतवाद पसरवत आहे. त्यासाठी जगभरात पाकिस्तान अनेक दहशतवादी निर्यात करत आहे. पाकिस्तानला निर्दोष लोकांना मारायचे आहे. तसंच अफगाण, बांगलादेशमध्येही पाकिस्तानचेच दहशतवादी आहेत. पाकिस्तानला आशिया रक्तरंजित करायचा आहे. आत्तापर्यंत पाकिस्तानचे 110 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले आहेत.

त्याचबरोबर, भारतीय सैन्याचा आम्हाला अभिमान आहे, त्यांच्या कार्याचा आम्हाला गर्व आहे. जवानांची शक्ती हे हिंदुस्थानचे मनोबल आहे, असं म्हणत मोदींनी भारतीय जवानांचा गौरव केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा